बिजमाता राहिबाई पोपेरे यांना हिलिंग लाईव्ह सामाजिक संस्थेतर्फे ट्रॅक्टर भेट

हिलिंग लाईव्ह या सामाजिक संस्थेतर्फे पद्श्री बिजमाता राहीबाई पोपेरे याच्या पारंपरिक देशी बीज संवर्धनासाठी एक हातभार म्हणून त्यांना ट्रॅक्टर भेट देण्यात आला. रांजणगाव महागणपती मंदिर प्रवेशद्वाराजवळ हा सोहळा शनिवार (दि २८) रोजी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरच्या श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती , हिवरे बाजार गावाचे आदर्श सरपंच पद्श्री पोपटराव पवार, कै सिंधुताई सपकाळ , हिलिंग लाईव्ह संस्था संस्थापक जानी विश्वनाथ या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा ट्रॅक्टर वितरण सोहळा संपन्न झाला.
Scroll to Top